स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी
स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी
हृदयी अमृत नयनीं पाणी
तुझिया पोटी अवतरती नर
अन्यायच ते करिती तुझ्यावर
दासी म्हणुनी नमविती चरणी !
कुशीत तुझिया पुरुष धुरंधर
अबला परि तू ठरिसी जगावर
दशा तुझी ही केविलवाणी !
सुंदरता तुज दिधली देवे
तुझी तुला ती परि न पेलवे
क्षणांत ठरली तूच पापिणी !
हृदयी अमृत नयनीं पाणी
तुझिया पोटी अवतरती नर
अन्यायच ते करिती तुझ्यावर
दासी म्हणुनी नमविती चरणी !
कुशीत तुझिया पुरुष धुरंधर
अबला परि तू ठरिसी जगावर
दशा तुझी ही केविलवाणी !
सुंदरता तुज दिधली देवे
तुझी तुला ती परि न पेलवे
क्षणांत ठरली तूच पापिणी !
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | वसंत पवार |
स्वर | - | सुधीर फडके |
चित्रपट | - | बाळा जो जो रे |
गीत प्रकार | - | चित्रगीत, नयनांच्या कोंदणी |
नोंद
समूहस्वर देणारे सर्व कलाकार ध्वनीमुद्रणाच्या वेळेस हजर राहू न शकल्याने स्वत: आशा भोसले कोरसमध्ये सहभगी झाल्या होत्या, असे आशाताईनी एका मुलाखतीत नमूद केले आहे.
समूहस्वर देणारे सर्व कलाकार ध्वनीमुद्रणाच्या वेळेस हजर राहू न शकल्याने स्वत: आशा भोसले कोरसमध्ये सहभगी झाल्या होत्या, असे आशाताईनी एका मुलाखतीत नमूद केले आहे.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.