सोळावं वरीस धोक्याचं
तरुणपणाच्या रस्त्यावरचं पहिलं ठिकाण नाक्याचं
अन् सोळावं वरीस धोक्याचं ग सोळावं वरीस धोक्याचं
पिसाट वारा मदनाचा
पतंग उडवी पदराचा
तोल सुटावा अशी वेळ ही तरी चालणं ठेक्याचं
रात रुपेरी फुलली ग
मला पौर्णिमा भुलली ग
अंगावरती सांडू लागलं टिपूर चांदणं रूप्याचं
ओढ लागली संगतीची
नजरभेटीच्या गमतीची
आज मला हे गुपीत कळलं जत्रेमधल्या धक्क्याचं

गीत | - | जगदीश खेबूडकर |
संगीत | - | वसंत पवार |
स्वर | - | सुलोचना चव्हाण |
चित्रपट | - | सवाल माझा ऐका |
गीत प्रकार | - | चित्रगीत, लावणी |
रूप्य | - | चांदी. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.