A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सोडि नच मजवरि

सोडि नच मजवरि वचनखरतरशरां ।
दग्‍ध करिसी तये हाय । मम अंतरा ॥

स्‍मृति काय पूर्विची । लोपली आजची ।
केवि तव मति रची । कल्पना भयकरा ॥
गीत - गोविंदाग्रज
संगीत - गंधर्व नाटक मंडळी, बाई सुंदराबाई
स्वर- अजितकुमार कडकडे
नाटक - एकच प्याला
राग - मालकंस
ताल-झपताल
चाल-त्याग वाटे सुलभ
गीत प्रकार - नाट्यसंगीत
केविं - कशा प्रकारे.
खर - कठिण (संस्कृत) / गाढव (मराठी).
दग्ध - जळालेले, होरपळलेले.
मति - बुद्धी / विचार.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.