शुभंकरोति म्हणा मुलांनो
दिवा पाहुनी लक्ष्मी येते करू तिची प्रार्थना
शुभंकरोति म्हणा मुलांनो, शुभंकरोति म्हणा
शुभंकरोति कल्याणम्, शुभंकरोति कल्याणम्
जेथे ज्योती, तेथे लक्ष्मी
उभी जगाच्या सेवाधर्मी
दिशादिशांतुन या लक्ष्मीच्या दिसती पाऊलखुणा
या ज्योतीने सरे आपदा
आरोग्यासह मिळे संपदा
शत्रुबुद्धीचा विनाश होता, सौख्य मिळे जीवना
दिव्या दिव्या रे दीपत्कार
कानी कुंडल मोतीहार
दिव्यास पाहून नमस्कार हा, रिवाज आहे जुना

गीत | - | जगदीश खेबूडकर |
संगीत | - | प्रभाकर जोग |
स्वर | - | लता मंगेशकर |
चित्रपट | - | थांब लक्ष्मी कुंकू लाविते |
गीत प्रकार | - | चित्रगीत, प्रार्थना |
कुंडल | - | कानात घालायचे आभूषण. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.