श्रीरामाचे दर्शन घडले
श्रीरामाचे दर्शन घडले
पाषाणातुनि शब्द उमटले
अपराधाची जाणीव नसता
घडले काही दीनानाथा
गुन्हेगार मी गौतम वदता
अपराधाने लज्जित झाले
अपराधाचे शासन म्हणुनी
भूवरी पडले शीळा होउनी
आज संपली करुण कहाणी
पदस्पर्शाने पावन झाले
पतितांना तू करिसी पावन
जन वदती तुज पतितपावन
सरले माझे देवा 'मी'पण
तुझ्या कृपेने जीवन तरले
पाषाणातुनि शब्द उमटले
अपराधाची जाणीव नसता
घडले काही दीनानाथा
गुन्हेगार मी गौतम वदता
अपराधाने लज्जित झाले
अपराधाचे शासन म्हणुनी
भूवरी पडले शीळा होउनी
आज संपली करुण कहाणी
पदस्पर्शाने पावन झाले
पतितांना तू करिसी पावन
जन वदती तुज पतितपावन
सरले माझे देवा 'मी'पण
तुझ्या कृपेने जीवन तरले
गीत | - | योगेश्वर अभ्यंकर |
संगीत | - | एम्. जी. गोखले |
स्वर | - | सुमती टिकेकर |
गीत प्रकार | - | भावगीत, राम निरंजन |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.