A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
श्रीहरी विदुराघरी पाहुणा

सुवर्णद्वारावतिचा राणा
श्रीहरी विदुराघरी पाहुणा !

मिष्टान्‍ने कोठुन?
आणिला कणीकोंडा रांधुन
सांगे आवर्जुन
भाबडी विदुराची सुगरण
वानी रुचकरपणा !

कवळ मुखी नेतसे
मागुनी पुन्हा पुन्हा घेतसे
तृप्त मनी होतसे
तृप्तीची ढेकर वर देतसे
विसरे जलपाना !

प्रेमळपण आगळे
चाटितो उरलीसुरली दळे
योग्यांना ना मिळे
मूर्त ते परब्रह्म सावळे !
काय लाडकेपणा !