श्रावणसरी
सोशिक माती अशी सारखी वर्षावाने भिजे
युगायुगांची उत्कट आशा अक्षर होऊन रूजे
केव्हा हसणे, केव्हा रडणे, कधी सोसणे कळा
असा चालला इथे सनातन सृजनाचा सोहळा
कशी मनातून मने गुंतती भाव दाटती उरी
उन्हात न्हाऊन सुंदर होऊन येती श्रावणसरी
जळथेंबानी कशी चमकते सृष्टी ही साजरी
कधी हासर्या कधी लाजर्या, आल्या श्रावणसरी
युगायुगांची उत्कट आशा अक्षर होऊन रूजे
केव्हा हसणे, केव्हा रडणे, कधी सोसणे कळा
असा चालला इथे सनातन सृजनाचा सोहळा
कशी मनातून मने गुंतती भाव दाटती उरी
उन्हात न्हाऊन सुंदर होऊन येती श्रावणसरी
जळथेंबानी कशी चमकते सृष्टी ही साजरी
कधी हासर्या कधी लाजर्या, आल्या श्रावणसरी
गीत | - | शान्ता शेळके |
संगीत | - | नरेंद्र भिडे |
स्वर | - | आशा भोसले |
गीत प्रकार | - | मालिका गीत |
टीप - • शीर्षक गीत, मालिका- श्रावणसरी, वाहिनी- झी मराठी. |
सृजन | - | निर्मिती. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.