शपथ दुधाची या आईच्या
शपथ दुधाची या आईच्या, फिर माघारी पोरी
तुझे भुकेने व्याकुळलेले बघुनी ग डोळे
उरी मायेच्या काळजाचे पाणी पाणी झाले
चार घास हे तुला भरविते माझ्या ओठावरले
डोळ्यांमधले पाजिल पाणी गंगा राजापुरी
जन्मलीस तू अभिमानाच्या थोर मराठ्याकुळी
प्राण देउनी आजवर ज्यांनी अब्रू ही ग जपली
हरिश्चंद्रापरी सत्त्वकसोटी असेल ग अपुली
दुरुनी बाळे दैव पहाते गरिबी आणून घरी
तुझे भुकेने व्याकुळलेले बघुनी ग डोळे
उरी मायेच्या काळजाचे पाणी पाणी झाले
चार घास हे तुला भरविते माझ्या ओठावरले
डोळ्यांमधले पाजिल पाणी गंगा राजापुरी
जन्मलीस तू अभिमानाच्या थोर मराठ्याकुळी
प्राण देउनी आजवर ज्यांनी अब्रू ही ग जपली
हरिश्चंद्रापरी सत्त्वकसोटी असेल ग अपुली
दुरुनी बाळे दैव पहाते गरिबी आणून घरी
गीत | - | पी. सावळाराम |
संगीत | - | आनंदघन |
स्वर | - | लता मंगेशकर |
चित्रपट | - | राम राम पाव्हणं |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
राजापुरची गंगा | - | अचानक घडणारी गोष्ट. ( राजापुरची गंगा अकस्मात प्रकट होऊन वाहू लागते. ) |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.