A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
शंभो शिवहर करुणाकर

शंभो शिवहर, करुणाकर, हे विश्वेशा, गौरिप्रियकर ॥

अज्ञानी बलहीन आम्ही ।
शरणागत तव चरणां धरि शिरिं करुणयुत कर ॥

मार्गी आम्हां सर्वपरी ।
हे शशिमौली, तूं सांभाळी, जय काळीश्वर ॥