सावधान होई वेड्या
साधुसंत सांगून गेले त्याचा बोध घेई
सावधान होई वेड्या, सावधान होई
सोने आणि रूपे अम्हां मृत्तीकेसमान
तुकाराम बोले त्याची मनी ठेव जाण
सुखाची ही पायवाट काट्यांतून जाई
मनासज्जनांच्यासंगे धरी भक्तिपंथ
रामदास बोले त्याची मनी धरी खंत
आभाळाचा डोळा सारे खेळ तुझे पाही
रोज मानवाची हत्या, रोज वाटमारी
पापामधी झालं नाही कुणी वाटेकरी
वाल्याकोळी नारदाच्या लीन झाला पायी
सावधान होई वेड्या, सावधान होई
सोने आणि रूपे अम्हां मृत्तीकेसमान
तुकाराम बोले त्याची मनी ठेव जाण
सुखाची ही पायवाट काट्यांतून जाई
मनासज्जनांच्यासंगे धरी भक्तिपंथ
रामदास बोले त्याची मनी धरी खंत
आभाळाचा डोळा सारे खेळ तुझे पाही
रोज मानवाची हत्या, रोज वाटमारी
पापामधी झालं नाही कुणी वाटेकरी
वाल्याकोळी नारदाच्या लीन झाला पायी
गीत | - | जगदीश खेबूडकर |
संगीत | - | राम कदम |
स्वर | - | पं. वसंतराव देशपांडे |
चित्रपट | - | भोळी भाबडी |
राग | - | भीमपलास |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
मृत्तिका | - | माती. |
रूप्य | - | चांदी. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.