सावध हरिणी सावध ग
सावध हरिणी सावध ग, करील कुणीतरी पारध ग
रसरसलेली तुझी ग ज्वानी, चंचल नयनी गहिरे पाणी
घातुक तुजला तुझी मोहिनी, सावध
उन्मादाचे अंगी वारे, पिसाट फिरता उरी कापरे
थरथर काळीज हलते रमणी, सावध
मादक धुंदी तुझीच सगळी, दिशांत भरुनी नभात चढली
मोहाचा क्षण झापड नयनी, सावध

गीत | - | पी. सावळाराम |
संगीत | - | विश्वनाथ मोरे |
स्वर | - | जयवंत कुलकर्णी |
चित्रपट | - | माय माउली |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
रमणी | - | सुंदर स्त्री / पत्नी. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.