सासुर्यास चालली लाडकी
सासुर्यास चालली लाडकी शकुंतला
चालतो तिच्यासवे, तिच्यात जीव गुंतला !
ढाळतात आसवे मोर-हरीणशावके
मूक आज जाहले सर्व पक्षी बोलके
यापुढे सखी नुरे, माधवी-लते तुला !
पान पान गाळुनी दुःख दाविती तरू
गर्भिणी मृगी कुणी वाट ये तिची धरू
दंती धरुन पल्लवा आडवी खुळी तिला !
भावमुक्त मी मुनी, मला न शोक आवरे
जन्मदांस सोसवे दुःख हे कसे बरे?
कन्यका न कनककोष मी धन्यास अर्पिला !
चालतो तिच्यासवे, तिच्यात जीव गुंतला !
ढाळतात आसवे मोर-हरीणशावके
मूक आज जाहले सर्व पक्षी बोलके
यापुढे सखी नुरे, माधवी-लते तुला !
पान पान गाळुनी दुःख दाविती तरू
गर्भिणी मृगी कुणी वाट ये तिची धरू
दंती धरुन पल्लवा आडवी खुळी तिला !
भावमुक्त मी मुनी, मला न शोक आवरे
जन्मदांस सोसवे दुःख हे कसे बरे?
कन्यका न कनककोष मी धन्यास अर्पिला !
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वर | - | सुधीर फडके |
चित्रपट | - | सुवासिनी |
राग | - | जोग |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
कनक | - | सोने. |
नुरणे | - | न उरणे. |
पल्लव | - | पदर. |
माधवी (माध्वी) | - | वसंत ऋतू / मधापासून केलेले मद्य. |
लता (लतिका) | - | वेली. |
शावक | - | मूल. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.