A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
संशय कां मनिं आला

संशय कां मनिं आला । कळेना ।
कारण काय तयाला ॥

आळ वृथा कीं, चित्र दिलें मीं ।
कोणा परपुरुषाला ॥

कोपुनि गेले, ही मज लागे ।
हळहळ घोर मनाला ॥
गीत - गो. ब. देवल
संगीत - गो. ब. देवल
स्वराविष्कार- बालगंधर्व
नीलाक्षी जुवेकर
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक - संशयकल्लोळ
राग - खमाज
चाल-श्याम घुंगट पट खोलो
गीत प्रकार - नाट्यसंगीत, मना तुझे मनोगत
आळ - आरोप.
वृथा - व्यर्थ.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  बालगंधर्व
  नीलाक्षी जुवेकर