सांजवात लावते
सांजवात लावते
आई, स्मरण तुझे होते
मिटल्या नयनी तुझीच मूर्ती
येऊन सांगे शुभंकरोती
गहिवरुनी अश्रू सांगती
भरचुड्याचे कर जोडिते
सुखी संसारी तुझ्या कृपेनं
कौतुक करण्या नाहीस तू पण,
पोरकीच ना आता तुजविण
लेक लाडकी हाक मारते
बघण्या तुजला एकदाच ते
माहेराला चालत येते
कुशीत शिरुनी 'आई' म्हणते
भीक घाल तू मातृदेवते
आई, स्मरण तुझे होते
मिटल्या नयनी तुझीच मूर्ती
येऊन सांगे शुभंकरोती
गहिवरुनी अश्रू सांगती
भरचुड्याचे कर जोडिते
सुखी संसारी तुझ्या कृपेनं
कौतुक करण्या नाहीस तू पण,
पोरकीच ना आता तुजविण
लेक लाडकी हाक मारते
बघण्या तुजला एकदाच ते
माहेराला चालत येते
कुशीत शिरुनी 'आई' म्हणते
भीक घाल तू मातृदेवते
गीत | - | पी. सावळाराम |
संगीत | - | वसंत प्रभु |
स्वर | - | माणिक वर्मा |
गीत प्रकार | - | आई, भावगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.