सांगू कुणा रे कृष्णा
सांगू कुणा, रे कृष्णा? अंतरीच्या वेदना
कोण माझे तुजविना, देवकीच्या नंदना !
अंधारल्या दाही दिशा, वादळी वारा सुटे
लोपल्या वाटा हरी रे, एकली धावू कुठे?
गाय चुकली आडरानी गोपबाला, मोहना
कोण माझे तुजविना, देवकीच्या नंदना !
द्रौपदीच्या भाऊराया, धाव घेई श्यामला
लाज राखी रे सतीची, ऐक माझी प्रार्थना
कोण माझे तुजविना, देवकीच्या नंदना !
कोण माझे तुजविना, देवकीच्या नंदना !
अंधारल्या दाही दिशा, वादळी वारा सुटे
लोपल्या वाटा हरी रे, एकली धावू कुठे?
गाय चुकली आडरानी गोपबाला, मोहना
कोण माझे तुजविना, देवकीच्या नंदना !
द्रौपदीच्या भाऊराया, धाव घेई श्यामला
लाज राखी रे सतीची, ऐक माझी प्रार्थना
कोण माझे तुजविना, देवकीच्या नंदना !
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | मास्टर कृष्णराव |
स्वर | - | लता मंगेशकर |
चित्रपट | - | कीचकवध |
गीत प्रकार | - | चित्रगीत, हे श्यामसुंदर |
नंदन | - | पुत्र / इंद्राचे नंदनवन. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.