सांग सखे मी चोर कसा
सांग सखे मी चोर कसा
नटखट तू चितचोर असा
ही चोरी बळजोरी या प्रीतीच्या थापा रे
समजू नको उमजू नको खेळ नसे हा सोपा रे
घालुनी बेड्या नेतील वेड्या जन्मभरी तू कैदी जसा
बेहोशी मदहोशी हिरव्याहिरव्या किमयेची
यौवन हे मधुवन हे, पर्वा मज ना दुनियेची
या एकान्ती वनी दिनान्ती प्रणयासाठी जीव पिसा
रंगत ही संगत ही, या कैदेची और मजा
हात धरू साथ करू, दोघे भोगू एक सजा
या भेटीचा, मिठीदिठीचा, हृदयावरती गोड ठसा
नटखट तू चितचोर असा
ही चोरी बळजोरी या प्रीतीच्या थापा रे
समजू नको उमजू नको खेळ नसे हा सोपा रे
घालुनी बेड्या नेतील वेड्या जन्मभरी तू कैदी जसा
बेहोशी मदहोशी हिरव्याहिरव्या किमयेची
यौवन हे मधुवन हे, पर्वा मज ना दुनियेची
या एकान्ती वनी दिनान्ती प्रणयासाठी जीव पिसा
रंगत ही संगत ही, या कैदेची और मजा
हात धरू साथ करू, दोघे भोगू एक सजा
या भेटीचा, मिठीदिठीचा, हृदयावरती गोड ठसा
गीत | - | जगदीश खेबूडकर |
संगीत | - | एन्. दत्ता |
स्वर | - | उषा मंगेशकर, रवींद्र साठे |
चित्रपट | - | प्रीत तुझी माझी |
गीत प्रकार | - | चित्रगीत, युगुलगीत |
पिसे | - | वेड. |
रंगत | - | मौज. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.