सांग पोरी सांग सारे
सांग पोरी सांग सारे
लाजतेस का? सांग सारे
दोन वेण्या तीनपेडी
घालुनी चढलीस माडी
खाली येताना परंतु मोकळे सारे पिसारे
नीज का ग झेप घेते
पापणीचे लाल पाते
मंद का रात्रीत झाले कालचे तेजाळ तारे
कुंकु भाळी पांगलेले
गाल दोन्ही गुंजलेले
मैत्रिणीशी बोलताना अंग तुझे का शहारे?
लाजतेस का? सांग सारे
दोन वेण्या तीनपेडी
घालुनी चढलीस माडी
खाली येताना परंतु मोकळे सारे पिसारे
नीज का ग झेप घेते
पापणीचे लाल पाते
मंद का रात्रीत झाले कालचे तेजाळ तारे
कुंकु भाळी पांगलेले
गाल दोन्ही गुंजलेले
मैत्रिणीशी बोलताना अंग तुझे का शहारे?
गीत | - | मनमोहन नातू |
संगीत | - | |
स्वर | - | बबनराव नावडीकर |
गीत प्रकार | - | भावगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.