सांग निळ्या निळवंतीला
सांग निळ्या निळवंतीला तीट रेखिली चंद्रकला
नसे पौर्णिमा तरीही चंद्रमा ओती अपुल्या सकल कला
हर्षच माझ्या हृदयी राजा
उणे न काही तुला-मला
या कुंजामधी, तुज-माझ्यामधी स्वर्ग आज रे अवतरला
तू-मी दोन्ही राजा-राणी
घर चिमणे नदीकाठाला
घरात माझ्या उषा नि संध्या सुवर्ण तोरण दाराला
सांग निळ्या निळवंतीला
तीट रेखिली चंद्रकला
आणिक रजनी गाईल गाणी स्वप्नांची रिझवायाला

गीत | - | श्रीकृष्ण पोवळे |
संगीत | - | श्रीनिवास खळे |
स्वर | - | आशा भोसले |
चित्रपट | - | यंदा कर्तव्य आहे (१९५८) |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
कुंज | - | वेलींचा मांडव. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.