सांग ना मला गडे
सांग ना मला गडे, जायचे कुणीकडे?
सुटे सुगंधीत वसंत वारे
तरंगती वर प्रीतपाखरे
धुके पांढरे पडे तयांतुन जायचे तुला-मला पुढे
गगन शीरावर, पायी धरणी
सदा तरुण मी, तू चिरतरुणी
प्रश्न का तुला पडे जायचे असे सुखातुनी सूखाकडे
ज्यास न शेवट-विश्रांतीस्थळ
प्रीती म्हणजे मार्गच केवळ
तरी आवडे असे जायचे सदा सुखातुनी सूखाकडे
सुटे सुगंधीत वसंत वारे
तरंगती वर प्रीतपाखरे
धुके पांढरे पडे तयांतुन जायचे तुला-मला पुढे
गगन शीरावर, पायी धरणी
सदा तरुण मी, तू चिरतरुणी
प्रश्न का तुला पडे जायचे असे सुखातुनी सूखाकडे
ज्यास न शेवट-विश्रांतीस्थळ
प्रीती म्हणजे मार्गच केवळ
तरी आवडे असे जायचे सदा सुखातुनी सूखाकडे
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | वसंत प्रभु |
स्वर | - | पं. वसंतराव देशपांडे, सुमन कल्याणपूर |
चित्रपट | - | दिसतं तसं नसतं |
गीत प्रकार | - | चित्रगीत, युगुलगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.