सांग ना कुठे जाऊ
सांग ना कुठे जाऊ?
वेदना कुणा दावू?
रुसले प्रिया संगीत रे
कंठी रुते मम गीत रे
थकल्याच या विरही मना शिक्षा नको देऊ
दावू कुणा शृंगार हा?
झाला तनूवर भार हा
विरहात मी जळते प्रिया, दु:खा किती साहू?
ही का तुला नकळे व्यथा
सांगू किती? सरली कथा
स्पर्शाविना झुरते तनू, प्यासी कशी राहू?
जाळी मना अंगार रे
का प्रीतिची ही हार रे?
तुझियाविना पूजा-फुले आता कुणा वाहू?
वेदना कुणा दावू?
रुसले प्रिया संगीत रे
कंठी रुते मम गीत रे
थकल्याच या विरही मना शिक्षा नको देऊ
दावू कुणा शृंगार हा?
झाला तनूवर भार हा
विरहात मी जळते प्रिया, दु:खा किती साहू?
ही का तुला नकळे व्यथा
सांगू किती? सरली कथा
स्पर्शाविना झुरते तनू, प्यासी कशी राहू?
जाळी मना अंगार रे
का प्रीतिची ही हार रे?
तुझियाविना पूजा-फुले आता कुणा वाहू?
गीत | - | उमाकांत काणेकर |
संगीत | - | श्रीकांत ठाकरे |
स्वर | - | दिलराज कौर |
गीत प्रकार | - | भावगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.