A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
संधिप्रकाशांत अजून जों

आयुष्याची आतां झाली उजवण
येतो तो तो क्षण अमृताचा.

जें जें भेटे तें तें दर्पणींचे बिंब :
तुझें प्रतिबिंब लाडेंगोडें.

सुखोत्सवें असा जीव अनावर :
पिंजर्‍याचें दार उघडावें.

संधिप्रकाशांत अजून जों सोनें
तों माझीं लोचनें मिटों यावीं;

असावीस पास, जसा स्वप्‍नभास,
जीवीं कासावीस झाल्याविना;

तेव्हा सखे आण तुळशीचें पान,
तुझ्या घरीं वाण नाही त्याची;

तूंच ओढलेलें त्यासवें दे पाणी,
थोर ना त्याहुनी तीर्थ दुजें;

वाळल्या ओठां दे निरोपाचें फूल;
भुलींतली भूल शेवटली;
गीत - बा. भ. बोरकर
संगीत - सलील कुलकर्णी
स्वर- सलील कुलकर्णी
अल्बम - संधीप्रकाशात
गीत प्रकार - भावगीत
  
टीप -
• काव्य रचना-
  आयुष्याची आतां झाली उजवण - ८ जुलै १९७९.
  संधिप्रकाशांत अजून जों - ११ जुलै १९७३.
उजवण - उद्यापन, बोळवण / साफल्य.
वाण - उणीव.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.