संपली कहाणी माझी
संपली कहाणी माझी संपली कहाणी !
धुंद चांदण्या त्या राती
संगतीस होती प्रीती
स्वप्नभारल्या जिवाला
आस मीलनाची होती
आस लोपली ती आता, म्लान रातराणी !
मुके पाखरू ये कोणी
प्रेमशून्य माझ्या गेही
लळा लावुनी का ऐसा
उडुन आज जावे तेही?
बाहुलीविना त्या दृष्टी अंध दीनवाणी !
अर्थहीन जीवन झाले
प्रेमबंध तुटता सारे
दिशांतून घेरित आले
क्रूर वादळाचे वारे
विनाकिनार्याची राहे रात ही दिवाणी !
धुंद चांदण्या त्या राती
संगतीस होती प्रीती
स्वप्नभारल्या जिवाला
आस मीलनाची होती
आस लोपली ती आता, म्लान रातराणी !
मुके पाखरू ये कोणी
प्रेमशून्य माझ्या गेही
लळा लावुनी का ऐसा
उडुन आज जावे तेही?
बाहुलीविना त्या दृष्टी अंध दीनवाणी !
अर्थहीन जीवन झाले
प्रेमबंध तुटता सारे
दिशांतून घेरित आले
क्रूर वादळाचे वारे
विनाकिनार्याची राहे रात ही दिवाणी !
गीत | - | शान्ता शेळके |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वर | - | सुधीर फडके |
चित्रपट | - | हा माझा मार्ग एकला |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
गेह | - | घर. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.