सखे शशिवदने
सखे शशिवदने ।
किती रुचिर, बिंबसम अधर, परम सुकुमार ॥
अधरसुधा तव पिउनी कसें गे ।
अयशोविष मी सेविन सांगे ।
विधुकरशुचिरदने ॥
किती रुचिर, बिंबसम अधर, परम सुकुमार ॥
अधरसुधा तव पिउनी कसें गे ।
अयशोविष मी सेविन सांगे ।
विधुकरशुचिरदने ॥
गीत | - | गो. ब. देवल |
संगीत | - | गो. ब. देवल |
स्वर | - | पं. जितेंद्र अभिषेकी |
नाटक | - | मृच्छकटिक |
राग | - | ललत |
ताल | - | त्रिताल |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत, शब्दशारदेचे चांदणे |
अधर | - | ओठ. |
अयशो | - | अपकीर्त (अयशस्- दुष्कीर्ति). |
रुचिर | - | मोहक, सुंदर. |
रदन | - | दात. |
विधु | - | चंद्र. |
शुचि | - | शुद्ध, पवित्र, स्वच्छ. |
शशी | - | चंद्र. |
सुधा | - | अमृत / सरळ, योग्य मार्गाने जाणारा. |
कविवर्य शूद्रकराजकृत 'मृच्छकटिक' प्रकरणाचा आधुनिक रसिकांच्या संगीतभक्तीस व संगीतपद्धतीस अनुसरून रंगभूमीवर प्रयोग करून दाखविण्यास, वेळेच्या व पात्रांच्या संबंधानें, त्यांतल्यात्यांत सुलभ पडावें म्हणून, मी जे त्यांत फेरफार केल आहेत ते असे:-
१. मूळ प्रकरण दशांकी आहे; परंतु तें मीं सप्तांकी केले.
२. कविप्रशंसा गाळून नटीसूत्रधारसंवाद थोडक्यांत आणिला. ३. द्यूतकारांचें भांडण, चंदनक व वीरक यांची परस्परांशीं मारामारी, तसेंच गोपालपुत्र आर्यक याचा प्रवेश, हे तिन्ही भाग संगीतांत अतिशय महत्त्वाचे न वाटल्यामुळे सबंध कमी केले. परंतु अवश्य स्थळीं त्यांचा संबंध मात्र सोडला नाहीं.
४. बहुतेक पात्रांच्या भाषणांतील अधिक सरस भाग ठेवून बाकीचा करितां आला तेथें कमी केला आहे.
५. नायिका वसंतसेनेचे विचार क्वचित्स्थळीं विस्तृत केले आहेत.
६. तिसरा व चवथा मिळून एक अंक केला; सातवा अंक तारतम्यतः अत्यावश्यकतेचा व फारसा रसाळ नसल्यामुळे समग्र गाळला; आणि सहावा व आठवा मिळून एक अंक केला.

शेवटीं इतकें सांगणें अवश्य आहे कीं, कै. परशुरामपंत तात्यांच्या भाषांतराचें मला बरेंच साहाय्य झालें. शकाराच्या श्लोकांपैकीं कांहीं श्लोक, व पात्रांचीं कांहीं भाषणे, हीं त्यांचींच कायम ठेविलीं आहेत.
(संपादित)
गोविंद बल्लाळ देवल
'संगीत मृच्छकटिक' या नाटकाच्या पुस्तकाच्या सहाव्या आवृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- विद्याधर हरि दामले (प्रकाशक)
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.