सजणा तू सांग कधी
सजणा तू सांग कधी येणार?
तू येण्याची सुंगंध वार्ता
अवचित माझ्या कानी पडता
डोळ्यांपुढती बघताबघता स्वप्न होइ साकार
मनात माझ्या मी रचलेले
धुंद मनोरे जगावेगळे
क्षणाक्षणाला घेऊ लागले मूर्तीमंत आकार
तुझ्याच चरणी वाहियलेली
मुग्ध मनाची प्रीत आगळी
हर्षभराने नकळत गाली उठवी गोड तुषार
तू येण्याची सुंगंध वार्ता
अवचित माझ्या कानी पडता
डोळ्यांपुढती बघताबघता स्वप्न होइ साकार
मनात माझ्या मी रचलेले
धुंद मनोरे जगावेगळे
क्षणाक्षणाला घेऊ लागले मूर्तीमंत आकार
तुझ्याच चरणी वाहियलेली
मुग्ध मनाची प्रीत आगळी
हर्षभराने नकळत गाली उठवी गोड तुषार
गीत | - | रमेश अणावकर |
संगीत | - | |
स्वर | - | पद्मजा दळवी |
गीत प्रकार | - | भावगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.