सजल श्याम घन गर्जत
सजल श्याम घन गर्जत आले
बरसत आज तुषार
आतां जीवनमय संसार
नाचवीत तळहातीं ज्वाला
वणव्याच्या कमरेस मेखला-
बांधुनिया हा ग्रीष्म कृतांतापरी करी संहार
लोपुन गेलें वसंतवैभव
सुगंध विरले नुरलें मार्दव
मंजुळ कोकिळकूजन सरलें होत सुने सहकार
जळक्या पिवळ्या माळावरती
पुलकित गंधित झाली माती
बिजें तृणांचीं गर्भामधुनी देत नवा हुंकार
रित्या नद्या सुकलेले निर्झर
भकास रानें उदास डोंगर
कृतज्ञतेनें बघती श्रवती मेघांचे ललकार
बरसत आज तुषार
आतां जीवनमय संसार
नाचवीत तळहातीं ज्वाला
वणव्याच्या कमरेस मेखला-
बांधुनिया हा ग्रीष्म कृतांतापरी करी संहार
लोपुन गेलें वसंतवैभव
सुगंध विरले नुरलें मार्दव
मंजुळ कोकिळकूजन सरलें होत सुने सहकार
जळक्या पिवळ्या माळावरती
पुलकित गंधित झाली माती
बिजें तृणांचीं गर्भामधुनी देत नवा हुंकार
रित्या नद्या सुकलेले निर्झर
भकास रानें उदास डोंगर
कृतज्ञतेनें बघती श्रवती मेघांचे ललकार
गीत | - | कुसुमाग्रज |
संगीत | - | प्रभाकर पंडित |
स्वर | - | प्रभाकर कारेकर |
गीत प्रकार | - | भावगीत |
टीप - • काव्य रचना- १९५०. |
कृतांत | - | यम, मृत्यू. |
पुलकित | - | आनंदित. |
मेखला | - | कमरपट्टा. |
ललकार | - | चढा स्वर / गर्जना. |
सहकार | - | आम्रवृक्ष. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.