सह्याद्रीवर ज्याचे तांडव
सह्याद्रीवर ज्याचे तांडव बघुनी मोगल थरथरला
तो शिवशंभू 'शिवाई'कृपे माझ्यावरती अवतरला
तो शिवशंभू 'शिवाई'कृपे 'शिवनेरी'वर अवतरला
'जुन्नर' माझे गाव राजधानी होती 'शक' राजाची
'नाणेघाटा'चा रक्षक मी, पाही सत्ता कितीकांची
रोखून धरला बाण जणू मी तख्तावर उत्तरेकडे
'देव' जन्मला इथे सांगती शत्रूला त्या सह्यकडे
'सातवाहन', 'यादव' अन् 'बहमनी', 'निजाम', 'मोगल'हि
ब्रिटीश आला तरी त्या माझ्या मरहट्ट्याची सर नाही
'पीर', 'परवानगी' अन 'हत्ती', 'शिपाई', 'महादरवाजा'
'फाटक', 'कुलाबकर' दरवाजांमधून प्रवेशता वर या
सह्याद्रीवर ज्याचे तांडव..
ओलांडूनी सप्तद्वारांना 'अंबरखाना' खुणवितो
'शिवाई' आठवा दरवाजा देवी चरणी नमवितो
राजमार्ग हा एक परि जी 'चोरवाट' लेण्यांकडुनी
अवघड जरी ही मला करी बिनधोक शत्रूच्यापासूनी
'उत्तर बुरूजा'वरी पाहता दरी, होति रोमांच खडे
'कडेलोट' टोकावरूनी बघता रिपुचा थरकाप उडे
'बदामी तलावा'त दिसे प्रतिबिंब सरकारवाड्याचे
त्या वाड्यावर जन्म घे प्रभु रक्षण करण्या रयतेचे
सह्याद्रीवर ज्याचे तांडव..
'शिवजन्माची वास्तू' ही तर माझ्या हृदयाचे स्थान
माझ्यावर अवतार घेउनी करि माझाचि सन्मान
बघता 'शिवकुंज मंदिरी' हे शिल्प जिजाऊ शिवबाचे
सजीव करि डोळ्यांपुढती सोनेरी क्षण इतिहासाचे
पूर्वेसी 'नारायण' माझ्या, 'हरिश्चंद्र' उत्तरी वसे
दक्षिणी 'ढाक', 'राजमाची', 'गोरक्ष', 'सिद्ध', 'मच्छिंद्र' बसे
पश्चिमेसी 'हडसर', 'चावंड', 'जीवधन', 'भैरव' मित्र असे
शिवबाच्या विजयाच्या गोष्टी त्यांच्याचकडूनी ऐकतसे
सह्याद्रीवर ज्याचे तांडव..
भाग्यवंत मी यात, परि जी खंत, ना मी स्वराज्यात
भरुनी येता ऊर, फडफडे भगवा माझ्या हृदयात
शिवबाचा नातू 'शाहू'बाळाने मजला जिंकीयले
पूर्ण करुनी इच्छा त्यांची मजला धन्य धन्य केले
बघता 'काळा चौथरा' आठवे कोळ्यांचा नरभेद
बंड मोगलांशी करता झाला इथेची शिरच्छेद
'गंगा यमुना' ह्या जलटाक्या शमवी तृषा तृषार्ताची
परि शिवभक्ताला लागू दे तृषा शिवाच्या सगुणांची
'भीमाशंकर' 'गिरिजात्मज' 'विघ्नेश्वर' आहे मज पाठी
असा गड 'शिवनेरी' मी जन्मे सह्याद्रीच्या पोटी

गीत | - | मिलिंद करमरकर |
संगीत | - | मिलिंद करमरकर |
स्वर | - | माधुरी करमरकर, मिलिंद करमरकर |
अल्बम | - | गीत दुर्गायन |
गीत प्रकार | - | प्रभो शिवाजीराजा, स्फूर्ती गीत |
तृषा | - | तहान. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.