A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सगुण संपन्‍न पंढरीच्या

सगुण संपन्‍न पंढरीच्या राया ।
आमुच्या स्वामिया केशिराजा ॥१॥

रामकृष्ण हरी श्रीधरा मुकुंदा ।
सज्जनीं स्वानंदा सर्वातीता ॥२॥

गोविंद गोपाळ गोपवेषधारी ।
गोवर्धन धरी नखावरी ॥३॥

दुष्ट दुर्जनासी दु:ख फार चित्तां ।
पावन पतितां नामा ह्मणे ॥४॥