रिमझिम पाऊस पडे
रिमझिम पाऊस पडे सारखा
यमुनेलाही पूर चढे
पाणीच पाणी चहूकडे, ग बाई
गेला मोहन कुणीकडे
तरुवर भिजले भिजल्या वेली
ओली चिंब राधा झाली
चमकुन लवता वरती बिजली
दचकुन माझा ऊर उडे, ग बाई
गेला मोहन कुणीकडे
हांक धावली कृष्णा म्हणुनी
रोखुनी धरली दाही दिशांनी
खुणाविता तुज कर उंचावुनी
गुंजत मंजुळ मुग्ध चुडे, ग बाई
गेला मोहन कुणीकडे
जलाशयाच्या लक्ष दर्पणी
तुझेच हसरे बिंब बघुनी
हसता राधा हिरव्या रानी
पावसातही ऊन पडे, ग बाई
गेला मोहन कुणीकडे
यमुनेलाही पूर चढे
पाणीच पाणी चहूकडे, ग बाई
गेला मोहन कुणीकडे
तरुवर भिजले भिजल्या वेली
ओली चिंब राधा झाली
चमकुन लवता वरती बिजली
दचकुन माझा ऊर उडे, ग बाई
गेला मोहन कुणीकडे
हांक धावली कृष्णा म्हणुनी
रोखुनी धरली दाही दिशांनी
खुणाविता तुज कर उंचावुनी
गुंजत मंजुळ मुग्ध चुडे, ग बाई
गेला मोहन कुणीकडे
जलाशयाच्या लक्ष दर्पणी
तुझेच हसरे बिंब बघुनी
हसता राधा हिरव्या रानी
पावसातही ऊन पडे, ग बाई
गेला मोहन कुणीकडे
गीत | - | पी. सावळाराम |
संगीत | - | वसंत प्रभु |
स्वर | - | आशा भोसले |
गीत प्रकार | - | हे श्यामसुंदर, ऋतू बरवा, भावगीत |
तरुवर | - | तरू / झाड. |
लवणे | - | वाकणे. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.