रेखिले मी ज्या प्रियेचे
रेखिले मी ज्या प्रियेचे रूप माझ्या लोचनी
तीच तू गे मोहिनी, तीच तू गे मोहिनी
मूक भाषा बोलणारे तेच डोळे वादळी
उमलत्या ओठांतले ते हास्य भोळे मखमली
बहरलेल्या यौवनाची मूर्त माया देखणी
मी तुझ्या मौनात सखये गीत माझे ऐकिले
भारलेल्या त्या स्वरांतच भान सारे गुंतले
अंतरंगी रंगली जी भावनांची रागिणी
सूर ते जुळता मनाचे शब्द गेले लोपुनी
अधीरल्या ओठांत फुलले एक नाते चंदनी
धुंद केले ज्या प्रियेने या सुखाच्या नंदनी
जीवनी उधळीत येता अमृताची पाऊले
जाहले साकार माझे चित्र ते स्वप्नांतले
फुलविली हृदयी जियेने प्रीतीची संजीवनी
तीच तू गे मोहिनी, तीच तू गे मोहिनी
मूक भाषा बोलणारे तेच डोळे वादळी
उमलत्या ओठांतले ते हास्य भोळे मखमली
बहरलेल्या यौवनाची मूर्त माया देखणी
मी तुझ्या मौनात सखये गीत माझे ऐकिले
भारलेल्या त्या स्वरांतच भान सारे गुंतले
अंतरंगी रंगली जी भावनांची रागिणी
सूर ते जुळता मनाचे शब्द गेले लोपुनी
अधीरल्या ओठांत फुलले एक नाते चंदनी
धुंद केले ज्या प्रियेने या सुखाच्या नंदनी
जीवनी उधळीत येता अमृताची पाऊले
जाहले साकार माझे चित्र ते स्वप्नांतले
फुलविली हृदयी जियेने प्रीतीची संजीवनी
गीत | - | वंदना विटणकर |
संगीत | - | प्रभाकर जोग |
स्वर | - | वसंत आजगांवकर |
गीत प्रकार | - | भावगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.