रे तुझ्यावाचून काही
रे तुझ्यावाचून काही येथले अडणार नाही
रे तुझ्यावाचून दुनिया दीन ही होणार नाही !
गर्व तव हा व्यर्थ, मी केले असे, केले तसे
चोंच देई पाखरांना, तोच चारा देतसे
एकही घरटे तुझ्याविण मोडुनी पडणार नाही !
तानसेनावाचुनी किंवा सदारंगाविण
काय मैफिल या जगाची रंगली केव्हाच ना?
कोण तूं? तुजवीण वीणा बंदही होणार नाही !
रे तुझ्यावाचून दुनिया दीन ही होणार नाही !
गर्व तव हा व्यर्थ, मी केले असे, केले तसे
चोंच देई पाखरांना, तोच चारा देतसे
एकही घरटे तुझ्याविण मोडुनी पडणार नाही !
तानसेनावाचुनी किंवा सदारंगाविण
काय मैफिल या जगाची रंगली केव्हाच ना?
कोण तूं? तुजवीण वीणा बंदही होणार नाही !
गीत | - | विद्याधर गोखले |
संगीत | - | नीळकंठ अभ्यंकर |
स्वर | - | कीर्ती शिलेदार |
नाटक | - | स्वरसम्राज्ञी |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.