राया मी रंभा की उर्वशी
चंद्रकलेची घडी मोडली, सांगा हो दिसते कशी?
राया मी रंभा की उर्वशी?
अवखळ चंचल माझं यौवन
अंगावरती आलं बहरून
अर्ध्याराती उरात माझ्या होई कासाविशी
दुनियेत सार्या माझ्यावाणी
गावंल का हो दुसरं कोणी
चुकुन पडलं तुमच्या हाती सोनं बावनकशी
मनासारखं माझ्या घडु द्या
जळतिल त्यांना खुशाल जळु द्या
नजरेमधला भाव निराळा तुम्हांस दावू कशी?
राया मी रंभा की उर्वशी?
अवखळ चंचल माझं यौवन
अंगावरती आलं बहरून
अर्ध्याराती उरात माझ्या होई कासाविशी
दुनियेत सार्या माझ्यावाणी
गावंल का हो दुसरं कोणी
चुकुन पडलं तुमच्या हाती सोनं बावनकशी
मनासारखं माझ्या घडु द्या
जळतिल त्यांना खुशाल जळु द्या
नजरेमधला भाव निराळा तुम्हांस दावू कशी?
गीत | - | राम मोरे |
संगीत | - | विश्वनाथ मोरे |
स्वर | - | रोशन सातारकर |
गीत प्रकार | - | लावणी |
चंद्रकळा | - | फक्त काळ्या रंगाची साडी. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.