यमुनाजळें ही काळी वो माय ॥१॥
बुंथ काळी बिलवर काळी ।
गळां मोतीं एकावळी काळीं वो माय ॥२॥
मी काळी कांचोळी काळी ।
कांस कांसिली ते काळी वो माय ॥३॥
एकली पाण्याला नवजाय साजणी ।
सवें पाठवा मूर्ति सांवळी वो माय ॥४॥
विष्णुदास नाम्याची स्वामिणी काळी ।
कृष्णमूर्ति बहु काळी वो माय ॥५॥
गीत | - | संत नामदेव |
संगीत | - | दत्ताराम गाडेकर |
स्वर | - | गोविंद पोवळे, प्रभाकर नागवेकर |
गीत प्रकार | - | हे श्यामसुंदर, संतवाणी |
एकावळी | - | एकपदरी हार. |
काचोळी | - | मागे बंद असलेली चोळी. |
कांस कांसिली | - | नेसलेले लुगडे / पातळ. |
बुंथी | - | आवरण / पडदा / आच्छादन. |
बिलवर | - | उच्च प्रतीची काचेची बांगडी. |
• श्री नामदेव गाथा (संग्राहक श्री. नानामहाराज साखरे) या ग्रंथात ही २२८२ क्रमांकाची रचना आहे.
• या गाथेतील
२२८९ क्रमांकाची 'हातीं घेवूनियां काठी',
२३०२ 'क्रमांकाची प्रात:काळी प्रहरा रात्रीं',
२३१२ 'क्रमांकाची उठा पांडुरंगा आतां दर्शन'
या आणि अशा काही रचनांच्या शेवटी 'विष्णूदास नामा' अशी नाममुद्रा आढळते.
आपण घरांतल्या लग्नाच्या मुलीला काळी असेल तर सावळी, सावळी असेल तर गहूवर्णी, गहूवर्णी असेल तर चक्क गोरी म्हणतो. पण येथे ही बिलंदर गोपी स्वत:ला गोरी असून काळी व बाहेरच्या 'कृष्णा'ला सावळी म्हणून मोकळी ! विष्णुदास नाम्याला हा चावटपणा पसंत नाही. तो साफ सांगतो "माझी स्वामिनी काळी नाही बहूकाळीच आहे.
या पदातली लय लक्षणीय आहे. तळ्यातील पाण्यावर दगड टाकला कीं तरंगाची वर्तुळे मोठी मोठी होत जातात त्याप्रमाणे प्रत्येक ओळीतील काळ्या रंगाचे विशेष्य मोठे होते; रात्र-घागर-यमुना जळ; बुंथ-बिलवर-गळामोती एकावळी; मी-कांचोळी-कांसे कासिली. मस्त जमलय कीं नाही?
(संपादित)
शरद
* या लेखकाशी संपर्क साधावयाचा आहे. वाचकांपैकी कुणास माहिती असल्यास aathavanitli.gani@gmail.com या पत्त्यावर ईमेल करावे, ही विनंती.)
सौजन्य- उपक्रम (http://mr.upakram.org) (१ जुलै, २००८)
(Referenced page was accessed on 31 July 2016)
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.