A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
रसिका गाऊ कोणते गीत

रसिका गाऊ कोणते गीत?
तीही जाता रुसुनी मजवर, रुसले रे संगीत !

जुळल्या तारा पहिल्या भेटी
राग रंगले जुळता प्रीती
झरे मेघमल्हार लोचनी, आठवता ती प्रीत !

तुटल्या तारा, रुसली वीणा
सूर संपले कुठल्या ताना
आज बैसलो निर्माल्याला तुजसाठी फुलवीत !