A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
रानी लिंबास आला बहार ग

हिरव्या साडीस पिवळी किनार ग
रानी लिंबास आला बहार ग

बाळवयातल्या गौळणी
यमुनेच्या जणू अंगणी
बाळकृष्णाशी करिती विहार ग

वाळवंटी घुमे पावरी
रानवारा तसा सूर धरी
डुलल्या गौळणी, हलले शिवार ग

नाच झाला ग झाला सुरू
किती आनंद डोळा भरू
बळीराजाचं देणं उदार ग