रंगुबाई गंगुबाई हात जरा
का ग अशा थांबला आपसांत पांगला
दिवस आज चांगला, भांगला ग भांगला
रंगुबाई, गंगुबाई, हात जरा चालू द्या
बिलवरासी बांगड्यांना किण्ण किण्ण बोलू द्या
घरात सवत, नाही ना खपत, तसंच गवत रानामंदी
धरून मुठीत, मुळात छाटीत, फेकत ऐटीत उन्हामंदी
रानातला रोग सारा बारा वाटा जाऊ द्या
शंभर खुरपी, सरळ तिरपी, चालवा सारखी जोसामंदी
वेग तो वाढवा, आवाज चढवा, भरा ग गोडवा उसामंदी
काजळाच्या खाणीवाणी वाफा वाफा होऊ द्या

गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वर | - | ललिता फडके, सुधीर फडके |
चित्रपट | - | चिमण्यांची शाळा |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
बिलवर | - | उच्च प्रतीची काचेची बांगडी. |
भांगला | - | वेगळे होणे. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.