विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई ॥१॥
वैकुंठवासिनी विठाई जगत्रजननी ।
तुझा वेधु माझे मनीं ॥२॥
कटि कर विराजित मुगूटरत्नजडित ।
पीतांम्बरू कासिला तैसा येईं का धांवत ॥३॥
विश्वरूपे विश्वंभरे कमल्ळनयनें कमळाकरे वो
तुझें ध्यान लागो बाप रखुमादेवीवरे वो ॥४॥
गीत | - | संत ज्ञानेश्वर |
संगीत | - | पं. हृदयनाथ मंगेशकर |
स्वर | - | लता मंगेशकर |
गीत प्रकार | - | संतवाणी, विठ्ठल विठ्ठल |
कटि | - | कंबर. |
किठाई | - | ’कृष्णाई’चे एक रूप. |
रंगण | - | रिंगण / फेर / मंडल / अंगण / सभा. |
रंगा | - | रंगणात. |
वेधु | - | ध्यास. |
हे माझे आई ! तू माझ्या हृदयात येऊन रहा. प्रेमरूप वैकुंठात राहणे तुला आवडते, असे मी ऐकले आहे. आणि माझ्या हृदयात तुझ्या प्रेमाशिवाय काहीच नाही. म्हणून तिथे तू अवश्य येऊन रहा. तू या विश्वाची जननी आहेस. तू स्वत:च विश्व-रूपिणी आहेस. विश्वाचे भरण करणारी तूच आहेच. कमलवत् निर्लिप्त नेत्रांनी तू ह्या विश्वाचे कौतुक पाहणारी साक्षि-रूपिणी आहेस. निर्लिप्ततेची तर तू खाणच आहेस. माझ्या हृदयात राहण्याने तुला तर लेप लागणारच नाही आणि मी मात्र तुझ्या स्पर्शाने तुझे ध्यान लागून त्वद्रूप होऊन जाईन.
आचार्य विनोबा भावे
ज्ञानेश्वरांची भजनें
सौजन्य- परंधाम प्रकाशन, वर्धा.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.