A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
रक्ष रक्ष ईश्वरा भारता

रक्ष रक्ष ईश्वरा ! भारतां प्राचीना जनपदा ।
भोगियली बहु, जयें एकदां, वैभवसुखसंपदा ॥

सागरद्वीपाहूनी; सिंधु तो काश्मिरापासुनी ।
कृष्ण-कुमारीकडे शांतिचें राज्य देइ पसरुनी ॥

प्रेमभाव धरुनियां पुत्र हे, ऐक्य करुत झडकरी ।
नित्य स्वधर्मा जाणुनी, करूं दे कर्तव्यें हीं खरीं ॥

शाश्वत-सत्य-ज्ञान-दिवाकर, उगवो हृदयान्‍तरीं ।
धर्म-तेज देखुनी, चकित हो, देववृंद अंबरीं ॥

गाढ तमीं बुडतसे राष्ट्र हें, उद्बोधन या करीं ।
कृपा-कटाक्षें, पुन्हां चढूं दे वैभव-शिखरावरी ॥

रोम-रंध्रिं चैतन्य खेळवीं, राष्ट्राच्या ईश्वरा ।
सात समुद्रावरी फडकुं दे, यशो-ध्वजा सुंदरा ॥

​हे पार्थ-सारथे, हे कंसारिविजयवन्ता ।
हे एक-वचन रामा, हे धनुर्धरानन्ता ।
सोडीं न यांस विकलां, हा काल असे पडता ।
आर्य-पुत्र जरि अपात्र दिसले, घ्याया स्वीया पदा ।
रक्ष भारता सहाय्यहीना, ईशा ! चिर-सौख्यदा ॥
गीत - राजा बढे
संगीत -
स्वर-
गीत प्रकार - स्फूर्ती गीत
  
टीप -
• या गीताचे मूळ ध्वनीमूद्रण आमच्याकडे नाही. आपल्याकडे असल्यास, कृपया aathavanitli.gani@gmail.com या इ-पत्त्यावर पाठवा. ते रसिकांना ऐकण्यासाठी इथे उपलब्ध करून दिले जाईल.
कंसारी - कंसाचा नाश करणारा (कृष्ण).
रंध्र - छिद्र / व्यंग / उणीव.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.