रचिल्या कुणी या प्रेमकथा
रचिल्या कुणी या प्रेमकथा?
नभी दिवसाचा देव उगवला
धरणीवरी का नवा तजेला
दंव डोळ्यांतील पार पळाले, त्यानी तिज पाहता
रचिल्या कुणी या प्रेमकथा?
ही चाफ्याची कळी गोरटी
अति लाजवट, खुळी पोर ती
कशी उमलली, गीत लाडके वार्याचे ऐकता
रचिल्या कुणी या प्रेमकथा?
नवपर्णांनी पूर्ण लहडला
वृक्षराज हा गगना भिडला
कशी तयाला दे आलिंगन, कोमल पुष्पलता
रचिल्या कुणी या प्रेमकथा?
नभी दिवसाचा देव उगवला
धरणीवरी का नवा तजेला
दंव डोळ्यांतील पार पळाले, त्यानी तिज पाहता
रचिल्या कुणी या प्रेमकथा?
ही चाफ्याची कळी गोरटी
अति लाजवट, खुळी पोर ती
कशी उमलली, गीत लाडके वार्याचे ऐकता
रचिल्या कुणी या प्रेमकथा?
नवपर्णांनी पूर्ण लहडला
वृक्षराज हा गगना भिडला
कशी तयाला दे आलिंगन, कोमल पुष्पलता
रचिल्या कुणी या प्रेमकथा?
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | विश्वनाथ मोरे |
स्वर | - | सुमन कल्याणपूर |
चित्रपट | - | नंदिनी |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.