प्रिया आज आले मैफलीत
प्रिया आज आले मैफलीत माझ्या
रंग-सूर ल्याली पश्चिमा, गीतास आली लालिमा !
तुझी साद ऐकुनी मी रे फुलारून आले
सूरांतल्या चैतन्याने मीच गीत झाले
अमृतात न्हाली पौर्णिमा, प्राणांत उमले चंद्रमा
हळूहळू निशिगंधाचे प्रीतस्पर्श प्याले
निशांत हा होता मी रे उषास्वप्न झाले
लाविता तुझ्या मी कुंकुमा, हासे नभाची नीलिमा

गीत | - | शांताराम नांदगांवकर |
संगीत | - | अरुण पौडवाल |
स्वर | - | अनुराधा पौडवाल |
गीत प्रकार | - | भावगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.