प्रीतीच्या चांदराती
प्रीतीच्या चांदराती घेउनी हात हाती
जोडू अमोल नाती, ये ना
ये प्रिये !
फुलला हा कुंज सारा, हसली पाने-फुले
रुसवा आता कशाला अधरी प्रीती फुले
हासते चांदणे !
सरला आता दुरावा, मिटती का लोचने
सखये या मीलनाला नुरले काही उणे
हात दे, साथ दे !
जोडू अमोल नाती, ये ना
ये प्रिये !
फुलला हा कुंज सारा, हसली पाने-फुले
रुसवा आता कशाला अधरी प्रीती फुले
हासते चांदणे !
सरला आता दुरावा, मिटती का लोचने
सखये या मीलनाला नुरले काही उणे
हात दे, साथ दे !
गीत | - | शांताराम नांदगांवकर |
संगीत | - | अनिल-अरुण |
स्वर | - | हेमंतकुमार |
गीत प्रकार | - | शब्दशारदेचे चांदणे, भावगीत |
कुंज | - | वेलींचा मांडव. |
नुरणे | - | न उरणे. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.