प्रेमस्वरूप आई
प्रेमस्वरूप आई ! वात्सल्यसिंधु आई !
बोलावुं तूज आता मी कोणत्या उपायीं?
नाहीं जगांत झाली आबाळ या जिवाची,
तूझी उणीव चित्तीं आई तरीहि जाची.
चित्तीं तुझी स्मरेना कांहींच रूपरेखा,
आई हवी म्हणूनी सोडी न जीव हेका.
ही भूक पोरक्याची होई न शांत आई,
पाहूनियां दुज्यांचें वात्सल्य लोचनांहीं.
वाटे इथूनि जावें, तूझ्यापुढें निजावें,
नेत्रीं तुझ्या हसावें, चित्तीं तुझ्या ठसावें !
वक्षीं तुझ्या परि हें केव्हां स्थिरेल डोकें,
देईल शांतवाया हृत्स्पंद मंद झोके?
घे जन्म तूं फिरूनी, येईन मीहि पोटीं,
खोटी ठरो न देवा, ही एक आस मोठी !
बोलावुं तूज आता मी कोणत्या उपायीं?
नाहीं जगांत झाली आबाळ या जिवाची,
तूझी उणीव चित्तीं आई तरीहि जाची.
चित्तीं तुझी स्मरेना कांहींच रूपरेखा,
आई हवी म्हणूनी सोडी न जीव हेका.
ही भूक पोरक्याची होई न शांत आई,
पाहूनियां दुज्यांचें वात्सल्य लोचनांहीं.
वाटे इथूनि जावें, तूझ्यापुढें निजावें,
नेत्रीं तुझ्या हसावें, चित्तीं तुझ्या ठसावें !
वक्षीं तुझ्या परि हें केव्हां स्थिरेल डोकें,
देईल शांतवाया हृत्स्पंद मंद झोके?
घे जन्म तूं फिरूनी, येईन मीहि पोटीं,
खोटी ठरो न देवा, ही एक आस मोठी !
गीत | - | माधव ज्युलियन |
संगीत | - | वसंत प्रभु |
स्वर | - | लता मंगेशकर |
राग | - | मधमाद सारंग |
गीत प्रकार | - | आई, कविता |
वक्ष | - | ऊर, छाती. |
वत्सल | - | प्रेमळ. |
सिंधु | - | समुद्र. |
हृत्स्पंद | - | (हृद् + स्पंद) हृदयाचा कंप, गती. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.