प्रेम हे माझेतुझे बोलायचे
प्रेम हे माझेतुझे बोलायचे नाही कधी
भेटलो आता परि भेटायचे नाही कधी
तू उभी जवळी अशी, खुणवी जरी एकान्त हा
कालच्या सलगीतुनी बिलगायचे नाही कधी
या जगी माझे तुझे दुरुनीच नाते शोभते
त्या जुन्या स्मरुनी खुणा जागायचे नाही कधी
होतसे सारेच का अपुल्या पसंतीसारखे
यापुढे शहरात या बहरायचे नाही कधी
जाऊ दे ही पालखी माझी तुझ्या दारातुनी
तू तुझे आयुष्य हे उधळायचे नाही कधी
भेटलो आता परि भेटायचे नाही कधी
तू उभी जवळी अशी, खुणवी जरी एकान्त हा
कालच्या सलगीतुनी बिलगायचे नाही कधी
या जगी माझे तुझे दुरुनीच नाते शोभते
त्या जुन्या स्मरुनी खुणा जागायचे नाही कधी
होतसे सारेच का अपुल्या पसंतीसारखे
यापुढे शहरात या बहरायचे नाही कधी
जाऊ दे ही पालखी माझी तुझ्या दारातुनी
तू तुझे आयुष्य हे उधळायचे नाही कधी
गीत | - | राम मोरे |
संगीत | - | श्रीनिवास खळे |
स्वर | - | अरुण दाते |
गीत प्रकार | - | भावगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.