प्रीतीचा साज हा आज मी
प्रीतीचा साज हा आज मी ल्याले, राधा तुझी झाले
अंतरी गुंजले रे सुखाचे उखाणे, भारलेले
तू छेडिता सूर ते यौवनाचे
झंकारले घुंगरू पापण्यांचे
मोहजाल चंचल लोचनात नाचे
दाटले चांदणे रोमरोमी नशेने रंगलेले
पारिजात देही फुलारून आला
मनी मीलनाचा गंध साठलेला
बेभान झाला मनमोर माझा
फुलवी पिसारा धुंदावलेला
स्वप्न ते भेटले भरजरी भावनेने रेखिलेले
मी तोडिले बंध हे लौकिकाचे
ना राखिले पाशही या जगाचे
किती प्राशिले मी घोट वादळाचे
गुंफिले प्राण मी रे तुझ्या भोवताली उधाणलेले
अंतरी गुंजले रे सुखाचे उखाणे, भारलेले
तू छेडिता सूर ते यौवनाचे
झंकारले घुंगरू पापण्यांचे
मोहजाल चंचल लोचनात नाचे
दाटले चांदणे रोमरोमी नशेने रंगलेले
पारिजात देही फुलारून आला
मनी मीलनाचा गंध साठलेला
बेभान झाला मनमोर माझा
फुलवी पिसारा धुंदावलेला
स्वप्न ते भेटले भरजरी भावनेने रेखिलेले
मी तोडिले बंध हे लौकिकाचे
ना राखिले पाशही या जगाचे
किती प्राशिले मी घोट वादळाचे
गुंफिले प्राण मी रे तुझ्या भोवताली उधाणलेले
गीत | - | वंदना विटणकर |
संगीत | - | बाळ बर्वे |
स्वर | - | सुषमा श्रेष्ठ |
गीत प्रकार | - | भावगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.