A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
प्रीती प्रीती सारे म्हणती

प्रीती प्रीती सारे म्हणती, प्रीती म्हणजे काय?

दिवस विलक्षण सुंदर तो क्षण
चाफ्याखाली तुला पाहिली
केस रेशमी, नयन बदामी
हसलीस का तू? हसलो का मी?
मनात आले काहीबाही आणि थबकले पाय

पायी हिरवळ, गगनी तारा
युवक समोरी हसरा गोरा
शीळ पुकारित गेला वारा
गोड शिरशिरी उभ्या शरीरी
तनामनातुन लहर एक ती वीज चेतवित जाय

नकळत नकळत जवळी सरलो
तरूवेलीसम का मोहरलो
लाजलाजे उगा राहिलो
हात मी तुझा हाती प्रिये घेतला
हृदयी असा या ठेऊन दिधला
कलकल कलकल करी अचानक पक्ष्यांचा समुदाय