प्रीती जडली तुझ्यावरी
प्रीती जडली तुझ्यावरी, कळेल का ते तुला कधी?
कळेल का ते तुला कधी, काय उमलते मनामधी?
नजर भेटता नजरेला बिंब लोचनी ते ठसते
धडधडते काळीज उरी, वीज नसांमधुनी घुसते
ओठांवर जे थरथरते ओळखशील का सांग कधी?
पैलतिरावर मूर्ति तुझी, वाट बघे मी ऐलतिरी
घुमतो पावा एक इथे सूर भरी लहरीलहरी
कसे पोचवू गीत तुला अफाट वाहे मधे नदी !
ताण सोसवे मुळी न हा, व्याकूळ झाला जीव अता
फुलल्यावाचून सुकायची अशीच का ही प्रेमकथा?
साद घातली मी तुजला, देशिल ना पडसाद कधी?
कळेल का ते तुला कधी, काय उमलते मनामधी?
नजर भेटता नजरेला बिंब लोचनी ते ठसते
धडधडते काळीज उरी, वीज नसांमधुनी घुसते
ओठांवर जे थरथरते ओळखशील का सांग कधी?
पैलतिरावर मूर्ति तुझी, वाट बघे मी ऐलतिरी
घुमतो पावा एक इथे सूर भरी लहरीलहरी
कसे पोचवू गीत तुला अफाट वाहे मधे नदी !
ताण सोसवे मुळी न हा, व्याकूळ झाला जीव अता
फुलल्यावाचून सुकायची अशीच का ही प्रेमकथा?
साद घातली मी तुजला, देशिल ना पडसाद कधी?
गीत | - | शान्ता शेळके |
संगीत | - | यशवंत देव |
स्वर | - | पद्मजा फेणाणी-जोगळेकर |
गीत प्रकार | - | भावगीत |
पावा | - | बासरी, वेणु. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.