प्रीत तुझी माझी कुणाला सांगू
प्रीत तुझी माझी कुणाला सांगू नको साजणी
पुन्हां पुन्हां हिणवुनी तुला ग हसतिल ना मैत्रिणी
सवें प्रीतिची ज्योती उजळूं
सवेच प्रीतीलहरी उधळूं
प्रसन्नतेनें निवांत खेळूं प्रीतीच्या अंगणी
चंदेरी रात्रीं जाउनिया
कांठावरुनी पाहूं दरिया
देईल सोबत येऊन उदया शुक्राची चांदणी
अपुल्या प्रीतीची ग द्वाही
फिरवूं नको इतुक्यांत कुठेही
उघडपणे मम गुणगौरवही करूं नको साजणी
पुन्हां पुन्हां हिणवुनी तुला ग हसतिल ना मैत्रिणी
सवें प्रीतिची ज्योती उजळूं
सवेच प्रीतीलहरी उधळूं
प्रसन्नतेनें निवांत खेळूं प्रीतीच्या अंगणी
चंदेरी रात्रीं जाउनिया
कांठावरुनी पाहूं दरिया
देईल सोबत येऊन उदया शुक्राची चांदणी
अपुल्या प्रीतीची ग द्वाही
फिरवूं नको इतुक्यांत कुठेही
उघडपणे मम गुणगौरवही करूं नको साजणी
गीत | - | बाबुराव गोखले |
संगीत | - | गजानन वाटवे |
स्वर | - | गजानन वाटवे |
गीत प्रकार | - | भावगीत |
द्वाही | - | दवंडी. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.