प्रीत ही डोळ्यांत माझ्या
प्रीत ही डोळ्यांत माझ्या गीत ते ओठांवरी
मी तुझ्या हृदयात आहे, तू असावे अंतरी
भावना दाटून आल्या दाटुनी संवेदना
कल्पनांनी जाणुनी घे अंतरीच्या या खुणा
काय बोलावे सुचेना मूक झाली वैखरी
भरुन आली का तुझी ती पावसाळी लोचने
का तुझ्या अश्रूंत भिजले केशरी ते चांदणे
सोड वेडे हा अबोला, वेल का तू लाजरी
मी फुलावे, मी हसावे, सांगते माझ्या मना
चंदनाच्या चांदण्यांनी गंध येतो जीवना
सप्तरंगी जीवनाचे गंध उधळू अंबरी
मी तुझ्या हृदयात आहे, तू असावे अंतरी
भावना दाटून आल्या दाटुनी संवेदना
कल्पनांनी जाणुनी घे अंतरीच्या या खुणा
काय बोलावे सुचेना मूक झाली वैखरी
भरुन आली का तुझी ती पावसाळी लोचने
का तुझ्या अश्रूंत भिजले केशरी ते चांदणे
सोड वेडे हा अबोला, वेल का तू लाजरी
मी फुलावे, मी हसावे, सांगते माझ्या मना
चंदनाच्या चांदण्यांनी गंध येतो जीवना
सप्तरंगी जीवनाचे गंध उधळू अंबरी
गीत | - | मधुकर जोशी |
संगीत | - | दशरथ पुजारी |
स्वर | - | दशरथ पुजारी, सुमन कल्याणपूर |
गीत प्रकार | - | भावगीत, युगुलगीत, नयनांच्या कोंदणी |
वैखरी | - | वाणी, भाषा. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.