A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
पिंगा घाल ग गौळणी

पिंगा घाल ग गौळणी, आले शारंगपाणी

आकाशीच्या चांदासाठी
फिरती चांदण्या अनंतकोटी
चमकत त्यांच्यावाणी,
पिंगा घाल ग गौळणी, आले शारंगपाणी

गुणगुण गाणे गातो भुंगा
कळ्या उधळती सुगंधरंगा
डोलत त्यांच्यावाणी,
पिंगा घाल ग गौळणी, आले शारंगपाणी

नभी विजेच्या उठती रेखा
मोर नाचतो उभवून पंखा
नाचत त्यांच्यावाणी,
पिंगा घाल ग गौळणी, आले शारंगपाणी

तक्कई तक्कई माझा पिंगा
येई तकतकी गोर्‍या रंगा
केतकीपानावाणी,
पिंगा घाल ग गौळणी, आले शारंगपाणी

पिंगा गोर्‍या रंगाचा ग
चपळ गोजिर्‍या अंगाचा ग
तहान दिसते नयनी
पिंगा घाल ग गौळणी, आले शारंगपाणी
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वर- स्वर कोणाचा(चे) माहित असल्यास संपर्क करा.
चित्रपट - संत गोरा कुंभार
गीत प्रकार - चित्रगीत
पिंगा - मुलींचा एक खेळ.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


Random song suggestion
  स्वर कोणाचा(चे) माहित असल्यास संपर्क करा.