पिकल्या पानाचा देठ की हो
दरबार जुना ह्यो, हंड्या-झुंबर नवं
मध्यान्ह रातीला आता लावा अत्तर-दिवं
अंगअंगी मी रंग खेळते, केसांमधी मरवा
पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा !
नख लागंल बेतानं खुडा
केशरी चुना अन् कात केवडा
लई दिसानं रंगल् विडा
व्हटाची लाली टिपुनी घ्याया
मुखडा असा फिरवा
पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा !
थोडी झुकून थोडी वाकते
पडला पदर, लाज झाकते
नेम धरून बाण फेकते
तुमचीमाझी हौस इश्काची
हळूहळू पुरवा
पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा !
मध्यान्ह रातीला आता लावा अत्तर-दिवं
अंगअंगी मी रंग खेळते, केसांमधी मरवा
पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा !
नख लागंल बेतानं खुडा
केशरी चुना अन् कात केवडा
लई दिसानं रंगल् विडा
व्हटाची लाली टिपुनी घ्याया
मुखडा असा फिरवा
पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा !
थोडी झुकून थोडी वाकते
पडला पदर, लाज झाकते
नेम धरून बाण फेकते
तुमचीमाझी हौस इश्काची
हळूहळू पुरवा
पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा !
गीत | - | जगदीश खेबूडकर |
संगीत | - | राम कदम |
स्वर | - | शोभा गुर्टू |
चित्रपट | - | कलावंतीण |
राग | - | यमन |
गीत प्रकार | - | चित्रगीत, लावणी |
मरवा | - | सुगंधी पाने असलेली एक वनस्पती. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.