फुटतो पान्हा पुन्हा पुन्हा
फुटतो पान्हा पुन्हा पुन्हा
कुणी तरी माझे बाळ आणा
रेशमाचे कुंची-झबले
या हातांनी मी शिवलेले
तसेच हाती राहुन गेले, घालून पाहू आता कुणा?
बाळ निजेची वेळ येते
पाळण्याची दोरी हलते
गहिवरता मी जो जो म्हणते, पाळणा हले सुना सुना
बाळ कुशीला देण्यासाठी
चिमणे चुंबन घेण्यासाठी
जितुके जीवन असेल गाठी देईन तुजला दयाघना
कुणी तरी माझे बाळ आणा
रेशमाचे कुंची-झबले
या हातांनी मी शिवलेले
तसेच हाती राहुन गेले, घालून पाहू आता कुणा?
बाळ निजेची वेळ येते
पाळण्याची दोरी हलते
गहिवरता मी जो जो म्हणते, पाळणा हले सुना सुना
बाळ कुशीला देण्यासाठी
चिमणे चुंबन घेण्यासाठी
जितुके जीवन असेल गाठी देईन तुजला दयाघना
गीत | - | पी. सावळाराम |
संगीत | - | वसंत प्रभु |
स्वर | - | आशा भोसले |
चित्रपट | - | बाळ माझं नवसाचं |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
कुंची | - | इरल्याच्या आकाराची लहान मुलांची टोपी. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.